या शैक्षणिक ब्लॉगवर आपले सहर्ष स्वागत आहे...............

12 August 2016

नमस्कार शिक्षक बंधू-भगिनींनो............
         

         प्रस्तुत ब्लॉगद्वारे मी फक्त समन्वयकाच काम करत आहे. आज आपल्या महाराष्ट्रात असे अनेक शिक्षक बंधू  भगिनी आहेत. जे रोज शिक्षण क्षेत्रात  नवनवीन काहीतरी करण्याच्या प्रयत्नात असतात. अशाच काही शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या ज्ञानात वाढ व विकास होण्यासाठी अनेक विविध प्रयोग, उपक्रम, शैक्षणिक साहित्य, ज्ञानरचनावादावर आधारित शिक्षण, वर्ग नियोजन असे विविध साहित्य आपल्या शिक्षक बांधवांसाठी  तयार केलेले  आहे.
          पण हे साहित्य ज्या त्या शिक्षकांच्या ब्लॉगवर किंवा वेबसाईट वर उपलब्ध करून दिलेले  आहेत. या सर्व शिक्षकांचे साहित्य तुम्हाला एकाच व्यासपीठावरून Online उपलब्ध व्हावे या एकाच  उदात्त हेतूने हा ब्लॉग तयार करण्याचा हा एक छोटासा प्रयत्न.
          संपूर्ण महाराष्ट्रातील तमाम तंत्रस्नेही शिक्षक बांधवांनी तयार केलेले साहित्य आणि माहिती संकलित करून मी आपल्या सर्वांच्या सहकार्याने ह्या ब्लॉगवर प्रसारित करणार आहे. या ब्लॉगला  भेट देऊन आपणास विविध शैक्षणिक तंत्रज्ञानाची माहिती मिळेलच. त्याचबरोबर ह्या ई-साहित्याचा आपल्या दैनदिन अध्यापनात  नक्कीच उपयोग होईल यात तीळ मात्र शंका  नाही.
         आपणाबरोबरच आपल्या इतर सहकाऱ्यांना देखील या शैक्षणिक तंत्रज्ञानाची माहिती आवश्य द्या  आणि विशेष म्हणजे आपल्याकडे काही डिजिटल ई-लर्निंग साहित्य असेल. तर कृपया माझ्या मेलवर rajeducation27@gmail.com  वर पाठवा. मी ते आपल्या नावासहित प्रकाशित करेन  व त्याचा आपल्या इतर बांधवांना त्याचा नक्कीच उपयोग होईल.
          आपल्या काही सूचना वा आक्षेप असेल तर जरूर माझ्या मेलवर संपर्क साधा .

                 धन्यवाद ......



                         :-  राजेश मधुकर साखरे
                                  7972262778




No comments:

Post a Comment